मराठवाड्यात केवळ ७० टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 01:09 PM2019-08-30T13:09:14+5:302019-08-30T13:12:32+5:30
सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़.
पुणे : पावसाळ्यातील तीन महिने संपत असताना मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे़. एलनिनोमुळे यंदा भारतात मॉन्सूनला मोठा फरक पडण्याची शक्यता असल्याची परदेशातील अनेक हवामान विभागांनी भाकीत व्यक्त केली होती़. सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़. मात्र, त्याचे वितरण नेहमीप्रमाणे विषम राहिले असून ३६ पैकी ११ हवामान विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़.
भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचा पाऊस ९६ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. सुधारित अंदाजातही त्यांनी पावसाचे अनुमान समाधानकारक असल्याचे म्हटले होते़. त्यानुसार आता तीन महिने पूर्ण होत असताना देशात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे़. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा तुफान पाऊस कोसळला़. कोकणात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर मध्य महाराष्ट्रात तब्बल ५४ टक्के पाऊस जादा झाला आहे़. त्याचवेळी मराठवाड्यावर मॉन्सूनने वक्रदृष्टी ठेवली आहे़. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़. सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असून विदर्भात ४ टक्के पाऊस कमी झाला आहे़. देशभरातील २२ हवामान विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून हे देशातील एकूण क्षेत्रफळापैकी ६९ टक्के भुभाग व्यापते़ तर देशाचा १७ टक्के भुभाग असलेल्या ७ विभागात सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर १४ टक्के भुभागावरील ७ हवामान विभागात अत्यंत कमी पाऊस झाला़.
़़़़़़़़़़
मराठवाड्यातील औरंगाबाद -१८, बीड -४३, हिंगोली -३०, लातूर -३३, जालना -३३, नांदेड -१९, उस्मानाबाद - २६, परभणी -३९ टक्के पाऊस कमी झाला आहे़. विदभार्तील यवतमाळ -३६, वाशिम - ३२, गोंदिया - १७ टक्के पाऊस कमी झाला आहे़. विदर्भातील फक्त गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या २४ टक्के पाऊस जादा झाला आहे़.
़़़़़़़
पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या २ सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यतेमुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि विदर्भात पुढील आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे़.
़़़़़़