नुसत्याच घोषणा... पदरी निराशा
By Admin | Published: February 25, 2015 01:37 AM2015-02-25T01:37:45+5:302015-02-25T01:37:45+5:30
नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित
नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित प्रश्न व समस्यांचा तिढा आजवर कधीच पूर्णत: सुटला नाही, उलटपक्षी काळानुरूप प्रश्न व अपेक्षाही बदलत गेल्या असल्या तरी, चार दशकांपूर्वी असलेल्या मागण्या अद्यापही कायम असल्याचे घेतलेल्या आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे.
रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला काय मिळाले? हे आजी-माजी खासदारांकडून जाणून घेतले असता, १० वर्षांतील प्रत्येक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला म्हटले, तर खूप काही मिळाले व कालांतराने ते रेल्वे बोर्डानेच हिरावून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कधी कधी सरकारनेच भरभरून द्यायचा प्रयत्न केला असता, ते घेण्यास जिल्ह्यातील जनतेचे हात थिटे पडले, तर कधी कधी मागितले खूप पण पदरी निराशाच पडल्याचे आढळून आले आहे.