मुंबई मनपासाठी 110 जागा दिल्या तरच भाजपाची शिवसेनेशी युती ?
By admin | Published: December 30, 2016 10:40 AM2016-12-30T10:40:51+5:302016-12-30T10:40:51+5:30
100 पेक्षा कमी जागा दिल्यास युती करणार नाही, असे भाजपाने शिवसेनेला सांगितले आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - शिवसेना आणि भाजपा या सत्तेतील दोस्तांमध्ये कोणत्या-ना- कोणत्या कारणावरुन कुस्ती सुरूच असते. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये तू-तू-मै-मै होण्याची शक्यता आहे. 100 पेक्षा कमी जागा दिल्यास युती करणार नाही, असे भाजपाने शिवसेनेला सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महापालिका निवडणुकांतील शिवसेना-भाजपा युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
227 जागांच्या मुंबई महापालिकेत 110 जागांची मागणी भाजपा करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी तयार केलेल्या अंतर्गत अहवालात भाजपाला 80 जागा देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र भाजपा 110 जागांच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीच्या जागावाटपावरुन सत्तेतील मित्रांमध्ये कुस्ती होणार? की समझोता होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी बातम्या