फक्त खर्च वाढला, सिंचन झालेच नाही!
By admin | Published: October 5, 2014 01:20 AM2014-10-05T01:20:48+5:302014-10-05T01:20:48+5:30
सिंचनासाठी राज्याने 82 हजार कोटी रुपयांपैकी 8क् हजार कोटी रुपये खर्च केले; मात्र सिंचनाची क्षमता त्या तुलनेत वाढली नाही.
Next
>प्रत्यारोप : जळगावमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची अजित पवारांवर टीका
संग्रामपूर (जि़ बुलडाणा) : सिंचनासाठी राज्याने 82 हजार कोटी रुपयांपैकी 8क् हजार कोटी रुपये खर्च केले; मात्र सिंचनाची क्षमता त्या तुलनेत वाढली नाही. सिंचनाचे धोरण राबविण्यात चूक झाली अशी कबुली देत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी जाहीर सभेत ते बोलत होत़े चव्हाण म्हणाले, आघाडीमुळे अनेक निर्णय घेताना अडचणी आल्या. विशेषत: स्वच्छ प्रशासनाच्या संदर्भात निर्णय घेताना अनेकांना अडचणीचे वाटले. आता आघाडी नाही आणि ज्या लाटेमुळे देशात सत्ता स्थापन झाली, ती लाट आता ओसरली आहे. त्यामुळे खिचडी सरकार निवडून देण्यापेक्षा काँग्रेससारख्या पक्षाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी केले.
चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दस:या मेळाव्यातील भाषणाचे थेट प्रसारण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. नागपूरची ही मंडळी एका वर्णाचा व एका धर्माचा विचार करणारी आहे, बहुजनांचा नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर करून, युती तुटल्याने आता दुध का दुध, व पाणी का पाणी होईल, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)