'इंजिनीअर' शेतकऱ्याने एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख

By अोंकार करंबेळकर | Published: September 14, 2017 02:53 PM2017-09-14T14:53:26+5:302017-09-14T19:52:10+5:30

तरुण पिढी शेतीकडे करिअर म्हणून सोडाच कर उपजिविकेचे साधन म्हणून देखिल पाहायला तयार नाही.

The only demand for an engineer's farmer, not the absence of debt relief | 'इंजिनीअर' शेतकऱ्याने एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख

'इंजिनीअर' शेतकऱ्याने एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख

googlenewsNext
ठळक मुद्देयूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाऱ्या जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतलं. पण जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या वैभव मुराद्रे या शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी थक्क करायला लावणारी आहे.इंजिनिअर असूनही त्याने शेतीच करायची ठरवली आणि  एक  एकर शेतीतून त्याने साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

ओतूर, दि१४- शेतीत काहीच राहीलं नाही, शेतात फुकट कष्ट करत राहण्यापेक्षा पोटापुरती नोकरी मिळवावी आणि पगाराच्या दिवसाची वाट पाहात महिने काढावेत असाच सर्वसाधारण विचार आजकाल देशातील शेतकऱ्यांच्या मनात आहे. तरुण पिढी शेतीकडे करिअर म्हणून सोडाच कर उपजिविकेचे साधन म्हणून देखिल पाहायला तयार नाही. पण जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या वैभव मुराद्रे या शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी थक्क करायला लावणारी आहे. इंजिनीअर असूनही त्याने शेतीच करायची ठरवली आणि  एक  एकर शेतीतून त्याने साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ओतूर येथे झालेल्या किसान महाचर्चेमध्ये त्याने आपल्या प्रयत्नांची गोष्ट इतर शेतकऱ्यांना सांगितली तेव्हा सर्व शेतकरी थक्कच झाले. या महाचर्चेमध्ये यूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाऱ्या जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले.  झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेता आले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

वैभव म्हणतो, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर १०-१५ हजार रुपयांची नोकरी करण्याचा पर्याय समोर होताच पण दुसरीकडे घरची ४ एकर शेतीही होती. त्यामुळे त्याने शेतीतच कष्ट करुन दाखवायचा निर्णय घेतला. पहिली एकदोन वर्षे योग्य हमीभाव न मिळाल्याने त्याला काही पिकांमध्ये तोटाही सहन करावा लागला, पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. या वर्षी त्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली आणि त्यासाठी यूपीएल कंपनीचे झेबा तंत्रज्ञान वापरले. मक्याच्या स्टार्चपासून केलेल्या झेबामुळे रोपांच्या मुळांना योग्य प्रमाणात व सतत अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होत राहिला, त्यामुळे इतरांपेक्षा वैभवच्या पिकांची वाढ व पर्यायाने उत्पन्नही भरपूर मिळाले. घरच्या सर्व लोकांनी मनापासून कष्ट केले तर शेतीसारखा व्यवसाय नाही असे वैभवचे मत आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळेस कांदा भरायला माणसे मिळत नसत तसेच येणाऱ्या लोकांना एका रात्रीसाठी एक हजार रुपये रोज द्यावा लागे. हे आव्हानही वैभवच्या कुटुंबाने स्वीकारले आणि ते स्वत:च कांदा भरायच्या कामाला लागले. यातून बचतही झाली. एक एकर शेतीसाठी त्याला दीड लाख खर्च आला आणि त्याला साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. टोमॅटोबरोबर कांदा, काॅलीफ्लाॅवर अशी पिकेही घेतो.

वैभवने शेतीत केलेल्या या प्रयोगाबद्दल त्याची काही मतं ठाम आहेत. यंदाच्या हंगामातील अनुभवानंतर तो सरळ सांगतो, माझा माझ्या कष्टावर आणि स्वकर्तृत्त्वावर विश्वास आहे, झेबासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याकडे माझा कल वाढला आहे. झेबामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झाली आणि रोपेही कमी प्रमाणात मेली, पाणी व्यवस्थापनही उत्तम झाले. त्यामुळे माझ्या शेतातील टोमॅटोचा आकारही एकसारखा होता आणि त्याला भाव चांगला मिळाला. आम्हाला भीक दिल्यासारखी कर्जमाफी नकोय आम्हाला फक्त हमीभाव द्या, बास! आम्ही या काळ्या मातीतून सोनं पिकवून दाखवू !

झेबामुळे शेती उत्पादनात क्रांती 
झेबा हे मक्याच्या स्टार्चपासून तयार केलेले उत्पादन आहे. आपल्या वजनाच्या चारशे पट पाणी धरुन ठेवणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शोषलेले पाणी योग्यवेळेस सतत मुळांना देत राहणं हे झेबाचं मुख्य काम आहे, मुळांभोवती पाणी व पोषकद्रव्ये साठवल्यामुळे पिकांना मोठा फायदा होतो. वाहून जाणारी पोषकद्रव्ये रोखल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते, इतकेच नव्हे तर जमिनीत हवा खेळती राहून जमिनीचा पोतही सुधारण्यास मदत होते. कांदा, डाळिंब, फ्लॉवर, टोमॅटो अशा विविध पिकांसाठी आम्ही झेबा वापरलं आहे. त्यामुळे पिके चटकन व सशक्त उभारीस घेत असल्याचं दिसून आलं आहे आणि फुले गळण्याचं प्रमाण कमी झालं. साहजिकच फळधारणेत वाढही दिसून आली. फळांचे आकार व गुणवत्ता चांगली वाढल्याने शेतक-यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल दिसून आले आहेत.
- समीर टंडन, क्षेत्रीय संचालक, यूपीएल 

झेबामुळे उत्पन्नात ३५% वाढ
एकेकाळी आमच्या गावात डाळिंबाला किंवा इतर पिकांना टॅकरने पाणी द्यावं लागे, पण मी झेबा वापरायला सुरुवात केल्यानंतर डाळिंबाला दिलेल्या पाण्याची बचत होऊ लागली. पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या. मी गेली २५ वर्षे शेती करतोय पण गेल्या १६ ते १७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा यावर्षी झेबामुळे उत्पन्नात ३५% वाढ झाल्याचे दिसून आले. एका डाळिंबांचे वजन ४०० ग्रॅम पर्यंत तर सर्वाधिक ७०० ग्रॅम वजनापर्यंत फळ वाढल्याचे दिसून आले.
- राहुल भोसले, कोथळे, ता.पुरंदर, जि. पुणे                

Web Title: The only demand for an engineer's farmer, not the absence of debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी