Nitin Gadkari: फक्त आठ इंचाचा कोट अन् खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल; नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:07 PM2021-10-04T21:07:18+5:302021-10-04T21:07:45+5:30

Nitin Gadkari in Nashik: ठाणे-मुंबई रस्ता फारच खराब आहे. याचे तातडीनं इंस्पेक्शन करण्याचे आदेश दिलेत असेही ग़डकरी म्हणाले.

Only an eight-inch coat will be a pit-free Maharashtra; Nitin Gadkari told in Nashik | Nitin Gadkari: फक्त आठ इंचाचा कोट अन् खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल; नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

Nitin Gadkari: फक्त आठ इंचाचा कोट अन् खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल; नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

Next

आपल्या देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. 3 लाख लोकं यात ग्रस्त होतात. 50 टक्के अपघात कमी होण्यासाठी तामिळनाडू सह अनेक राज्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात मात्र अद्याप यश नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नाशिकमधील फ्लायओव्हरच्या डिझाइनमध्ये चुका झाल्यानं 100 लोकं मृत्युमुखी गेल्याचं मला दुःख असल्याचे ते म्हणाले. (Nitin Gadkari in Nashik. Inauguration and Foundation Stone Laying Ceremony of 206 KM long 12 NH Projects worth Rs. 1678 Cr. in Nashik, Maharashtra )

सर्व कार मध्ये 6 एअर बॅग्स कम्पलसरी केल्या आहेत. झिरो अपघात होण्यासाठी ठाणे आणि नाशिकात कमिटी स्थापन करणार. मात्र मलाही मेट्रोच्या आवाजाचा त्रास होतो, अनेकांना होतो यामुळे मेट्रोला, साउंड बॅरियर्स लावायला सांगितले आहे.  नाशिकचं पर्यावरण खूप चांगलं आहे.  विकास होतोय, हे वातावरण खराब होऊ शकतं. पुण्यातील परिस्थिती फारच खराब आहे. नाशिक मधील गोडाऊन, हायवेवर शिफ्ट करा, मी मदत करायला तयार आहे, असेही गडकरी म्हणाले. 

नाशिकरोड ते द्वारका हा मेट्रो रूटवर डबलडेकर 2 लेन फ्लायओव्हर मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी 1600 कोटी मंजूर केले आहेत. 2 वर्षात याच्या उदघाटनासाठी मी येणार असल्य़ाची घोषणाही गडकरींनी केली.  ठाणे-मुंबई रस्ता फारच खराब आहे. याचे तातडीनं इंस्पेक्शन करण्याचे आदेश दिलेत असेही ग़डकरी म्हणाले. समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा रस्ता तयार करणार, त्यासाठी 5 हजार कोटींच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे हा नाशिकमधून 122 किमी जातो. 16 कोटी रुपये एका एकराला मागणी आहे, ती कमी करावी अशी राज्य सरकारला विनंती करत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळावे ही माझी इच्छा आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना, उद्योगांना मोठा फायदा होणार. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यात विकासाची मोठी संधी आहे असेही गडकरी म्हणाले. 

खड्डेमुक्त महाराष्ट्र
रस्त्यावर 8 इंचाचे व्हाइट टोपिंग केलं तर खड्डे पडणार नाहीत. राज्य सरकारनेही हा प्रयोग करावा, असा सल्ला गडकरींनी दिला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यात सहमती न झाल्यानं समुद्राला पाणी जातंय. 2 राज्यात मी मध्यस्थी करायला तयार असल्याचे देखील गडकरी म्हणाले. 
 

Web Title: Only an eight-inch coat will be a pit-free Maharashtra; Nitin Gadkari told in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.