हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल

By admin | Published: July 21, 2016 07:03 PM2016-07-21T19:03:57+5:302016-07-21T19:03:57+5:30

दुचाकी चालविणा-यांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. ज्यांच्याकडे हेल्मेट असेल त्यांनाच पेट्रोल देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री

Only if you have helmets will get the petrol | हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल

हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - दुचाकी चालविणा-यांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. ज्यांच्याकडे हेल्मेट असेल त्यांनाच पेट्रोल देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली.
दिवाकर रावते यांच्या घोषणेचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वागत केले. पण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणा-या पोलिसांवरही कारवाई होणार का? असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पोलिसांवर कारवाई पोलीस आयुक्त करतील अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.
दरम्यान, गेल्याच महिन्यात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता दिवाकर रावते यांनीही हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचा नियम केला. पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट असेल, तरच त्याला पेट्रोल देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Only if you have helmets will get the petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.