आमदारकीसाठी राहिला फक्त महिना

By admin | Published: September 13, 2014 11:16 PM2014-09-13T23:16:47+5:302014-09-13T23:16:47+5:30

विधानसभा निवडणूक लढविण्यासठी इच्छूक असलेल्या भावी आमदारांची उमेदवारीचा अर्ज भरताना, लागणा-या महापालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्रसाठी (एनओसी) धावपळ सुरू आहे.

The only month left for the MLA | आमदारकीसाठी राहिला फक्त महिना

आमदारकीसाठी राहिला फक्त महिना

Next
पुणो : अवघ्या महिन्याभर येऊन ठेपलेली  विधानसभा निवडणूक लढविण्यासठी इच्छूक असलेल्या भावी आमदारांची उमेदवारीचा अर्ज भरताना, लागणा-या महापालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्रसाठी (एनओसी) धावपळ सुरू आहे. त्यामुळे  ‘एरवी ए माङो काम झाल का रे’, असा दम भरत आवाज चढविणारे  हे इच्छूक आता  ‘साहेब आमच तेवढ एनओसीच बघा.’  अशा शब्दात मनधरणी करीत असल्याने अधिकारीही चक्रावले आहेत. दरम्यान, साहेबांच्या या कागदपत्रंसाठी त्याचे कार्यकर्तेही दिवसभर पालिकेत बसून राहत असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणूकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झालेल्या असल्या तरी, अनेक इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या बोहल्यावर चढलेले आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करताना, कोणतीही शासकीय देणी आपल्याकडे प्रलंबित नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यात महापालिकेचा मिळकतकर, पाणीपटटी, पलिकेची जागा भाडे कराराने घेतली असल्यास त्यासाठीचे थकबाकी नसलेले ना हरकरत प्रमाणपत्रही सादर करावे लागते. त्यामुळे उमेदवारीसाठी आपली वर्णी लागली तर आपली कागदपत्रे पूर्ण असावीत या उद्देशाने उमेदवारी अर्ज भरताना, आवश्यक असलेली कागदपत्रे तत्काळ हाताशी असावित यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून हे इच्छूक महापालिकेच्या फे-या मारीत आहेत. तर एरवी आपले काम करण्यासाठी केवळ फोन वरून अधिका-याशी चर्चा करण्यातच धन्यता मानणारे हे इच्छूक आता, थेट महापालिकेत हजेरी लावून अधिका-यांशी चक्क तासंनतास गप्पाही मारत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
 
कार्यकत्र्याचा 
पालिकेत ठिय्या 
 ही ना-हकरत प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी इच्छुकांना वारंवार हेलपाटे घालणो शक्य नसल्याने इच्छुकांच्या कार्यकत्र्यांनी महापालिकेत ठिय्याच मांडला आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीचे काम पाहणा:यांना आवश्यक असलेल्या फायली, ङोरॉक्स, तसेच इतर माहिती हे कार्यकर्तेच आणून देत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
 
4उमेदवारांना अर्ज दाखल करताना, कोणतीही शासकीय देणी आपल्याकडे प्रलंबित नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते.  यासाठी आता उमेदवारांना धावाधाव करावी लागत आहे.

 

Web Title: The only month left for the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.