केवळ कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीसच मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:09 AM2020-09-20T06:09:45+5:302020-09-20T06:09:59+5:30
नुकसानीची भीती : बांगलादेश, नेपाळ सीमेवर उभ्या असलेल्या ट्रकमधील कांद्यांचे काय?
योगेश बिडवर्ई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रसरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदारांनी बंदीच्या दिवसापर्यंत त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते, त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र बंदरांवर कंटेनरमध्ये भरून तयार असलेला व बांगलादेश आणि नेपाळ सीमेवर उभे असलेले ट्रक यांच्यातील तब्बल ३५ हजार टन म्हणजे १00 कोटींच्या कांदा निर्यातीचे काय, असा प्रश्न निर्यातदारांनी विचारला आहे.
नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तेथेही कस्टम्सकडे न सोपविलेला कोट्यवधींचा कांदा आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरावर तब्बल ३५0 कांद्याचे कंटेनर उभे आहेत. त्यातील बराचसा माल कस्टम्सकडे सोपविलेला नाही. त्याचे काय करायचे, असा प्रश्न आहे. कांदा नाशिवंत आहे. कांद्याला कोंब फु टण्याची भीती आहे. तो माल निर्यात न झाल्यास कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. त्याचा फटका बसून शेवटी देशातील भावही पडतील, असे नाशिक जिल्हा कांदा निर्यातदार संघटनेने सांगितले.
निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीयसीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती.
आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्र्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही.
निर्यातदारांपुढे अनिश्चितता
मुंबई बंदरावर ३५० कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर १०० कंटेनर, सीमेवर सुमारे २०० ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे ३५ हजार टन म्हणजे १०० कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल.
- अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना