शेतकरी संपाबाबत केवळ राजकारण - राम शिंदे
By admin | Published: May 24, 2017 02:41 AM2017-05-24T02:41:05+5:302017-05-24T02:41:05+5:30
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलाविले व चर्चा सकारात्मक झाली. तरीही शेतकऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असल्याने त्यामध्ये निश्चतच राजकारण असून संपाचे हत्यार म्हणजे विरोधकांचेच षड्यंत्र असल्याचा आरोप जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.
भाजपाच्या शिवार संवाद यात्रेबाबत पंचायत समिती, नगरपालिका सदस्यांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संप नव्याने सुरू करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही.