सध्या मंत्रिपद मिळवणे हाच राजकारणाचा एकमेव उद्देश झाला आहे - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 03:16 PM2017-10-05T15:16:00+5:302017-10-05T15:26:08+5:30
सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद, दि. ५ : सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सकाळी १० वाजता एमजीएम येथील एका कार्यक्रमात ' राजकारणात नैतिकता शिल्लक आहे का ?' या विषयावर ते बोलत होते.
यावेळी त्यांनी समाज, माध्यमे व राजकारण या तिन्ही विषयवार मार्मिक मते मांडली. ते म्हणाले, काहीही करून मंत्रीपद मिळवायचे असाच एकमेव उद्देश राजकारणात हल्ली दिसत आहे. यासाठी कोणताही मार्ग पत्करावा लागला तरी चांगले अशीच राजकारण्यांची भूमिका होत चाली आहे. यासोबतच मागच्याच आठवड्यात एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. मला वाटते आता राजकीय पक्ष स्थापनेवर कायदेशीर मर्यादा असायला हव्यात असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्या नव्या राजकीय पक्षावर खोचक टीका केली.
माध्यमांनी व समाजाने दबाव ठेवावा
राजकारण्यांवर समाजाने व माध्यमांनी दबाव ठेवायला हवा. तेव्हाच ते आपले काम योग्य पद्धतीने करतील. राजकारणात आता नैक्तीक्ता शिल्लक राहिली नाही. विधानसभेत आम्ही ' नैतिक समिती' स्थापन व्हावी याबद्दल पाठपुरावा करत आहे
हे सरकार असंवेदनशील
शेतक-यांच्या बाबतीत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. ३२ हजार कोटींची कर्जमाफी दिली अशी केवळ घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हि कर्जमाफी केवळ ५ हजार कोटींच्या आसपास असेल. असे हि ते म्हणाले.