येत्या निवडणुकीत 'राणेंचीच लाट' येणार : निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:11 PM2018-11-12T21:11:25+5:302018-11-12T21:12:19+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत झाली
वैभववाडी : येत्या निवडणुकीत अन्य कुणाचीही नाही, फक्त राणे लाटच असेल, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी वैभववाडीत व्यक्त केला.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले विकास सहज होत नसतो. त्यासाठी निधी आणणारा आपला सक्षम माणूस संसद आणि विधीमंडळात असावा लागतो. सिंधुदुर्गची ओळख निर्माण करण्यासाठी राणेंनी 40 वर्षे वेचली.
तुम्हाला आमदार मिळाला. त्यांना मंत्री, मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी तुमची आहे, अशी भावनिक साद निलेश राणे यांनी घातली. यावेळी दत्ता सामंत, सतीश सावंत, सम्राट महाडीक, भालचंद्र साठे यांची भाषणे झाली.
जयेंद्र रावराणे 'स्वाभिमान'मध्ये
चार वर्षांपूर्वी राणेंना सोडून शिवबंधन हाती बांधलेले जयेंद्र रावराणे यांनी या वेळी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. आपण राणेंच्या सुचनेनुसारच शिवसेनेत खबऱ्या बनून गेलो होतो, असे रावराणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.