निकालांची केवळ अफवाच राज्य शिक्षण मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:27 AM2018-05-06T06:27:56+5:302018-05-06T06:27:56+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत.
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला आहे. मात्र सोशल नेटवर्किं ग साईट्सवर जाहीर होणाऱ्या निकालांच्या तारखा या अफवा असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. तसेच या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी तसेच बारावीच्या निकालांच्या तारखा लवकरच जाहीर करणार आहे. या निकालांच्या तारखांची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात येईल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.