आता केवळ सात ओव्हर्सचे ‘सूपर सेव्हन क्रिकेट’
By admin | Published: October 8, 2016 01:15 PM2016-10-08T13:15:49+5:302016-10-08T13:15:49+5:30
दिवसेंदिवस गतीमान क्रिकेटचे वेड लागत असून, कसोटी, एकदिवसीयनंतर व्टेंटी - २० क्रिकेटकडे क्रिकेट जग वळले आहे.
Next
>विवेक चांदूरकर, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ८ - दिवसेंदिवस गतीमान क्रिकेटचे वेड लागत असून, कसोटी, एकदिवसीयनंतर व्टेंटी - २० क्रिकेटकडे क्रिकेट जगत वळले आहे. मात्र, आता हा खेळ आणखी छोटा झाला असून, राज्यभर सूपर सेव्हन क्रिकेटवर भर देण्यात येत. सूपर सेव्हन क्रिकेटचा प्रचार प्रसार होण्याकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने शालेय खेळांडूच्या स्पर्धा भरविण्यात येत आहे.
पहिली राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाणा येथे आयोजित केली आहे.
भारतात क्रिकेटचे वेड सर्वश्रृत आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळल्या जातो. पूर्वी पाच दिवसांच्या कसोटी त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला जास्त पसंती देण्यात आली. त्यानंतर व्हेंटी - २० क्रिकेटची लोकप्रियता वाढत असतानाच आता केवळ सात षटकांची क्रिकेट उदयास येत आहे. सूपर सेव्हन क्रिकेटला आता प्रारंभ झाला असून, शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने या खेळाचा प्रचार प्रसार करण्याकरिता विविध प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा सेव्हन
क्रिकेट असोसिएशनची स्थापणा करण्यात आली आहे. शालेय स्तरावर १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांची राज्यातील पहिली स्पर्धा बुलडाणा येथील क्रीडा संकूलावर आयोजित करण्यात आली आहे. या असोसिएशनच्यावतीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार असून, स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. क्रीडा विभाग व बुलडाणा जिल्हा क्रिकेट सेव्हन असोसिएशनच्यावतीने ही स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील आठ विभागातील संघ सहभागी होणार आहे. यानंतर आंध्रप्रदेशात १३ व १४ आॅक्टोबर रोजी देशपातळीवरील स्पर्धा होणार आहेत. यामध्ये २८ राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. बुलडाणा येथे आयोजित स्पर्धेतून आंधप्रदेशातील स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस क्रिकेट खेळ कमी षटकांचा होत असून, आता क्रिकेटप्रेमींना सात षटकांचे सामने बघायला मिळणार आहेत.
केवळ सात खेळाडूंचा संघ
कसोटी, क्रिकेट, व्टेंटी - २० संघात षटकांची मर्यादा कमी केली तरी खेळाडूंची मर्यादा कमी केली नव्हती. आता मात्र खेळाडूंची संख्या कमी करण्यात आली आहे. सुपर सेव्हन क्रिकेट संघात केवळ सातच खेळाडू असणार आहेत. पूर्ण संघात १२ खेळाडून राहणार असून, मैदानावर सात खेळाडू खेळतील तर पाच खेळाडू अतिरिक्त राहतील. सामना केवळ सात षटकांचा असेल. प्रत्येक
गोलंदाजाला दोन षटकांची मर्यादा असणार आहे.
क्रीडा विभागाच्यावतीने सुपर सेव्हन क्रिकेटकडे शालेय खेळाडू वळावे याकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा येथे सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यातून राज्यस्तरीय संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ पुढे आंतरदेशीय स्पर्धेत खेळणार आहे.
- अशोक गिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा