प्रचार फेरीत फक्त दहा वाहनांना परवानगी
By admin | Published: January 25, 2017 03:06 AM2017-01-25T03:06:50+5:302017-01-25T03:06:50+5:30
निवडणुकीत शेकडोच्या संख्येने वाहनांची प्रचार फेरी काढणाऱ्यांना आयोगाने चाप लावला असून, महापालिका, जिल्हा परिषदेच्या
नाशिक : निवडणुकीत शेकडोच्या संख्येने वाहनांची प्रचार फेरी काढणाऱ्यांना आयोगाने चाप लावला असून, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी फक्त दहा वाहनांनाच अनुमती देण्याचे ठरविले आहे.
निवडणूक प्रचार म्हटला की, समर्थकांना सोबत घेऊन शक्तिप्रदर्शनाची कोणतीही संधी उमेदवार व राजकीय पक्ष सोडत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करणे असो, वा मतदार संघात फेरी असो, अशा प्रसंगी उमेदवारासोबत समर्थकही शक्तिप्रदर्शन करीत सहभागी होत असतात. विशेष करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना उमेदवारासोबत वाहनाने प्रचार फेरी काढली जाते, अशा वेळी चारचाकी, दुचाकीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सदर वाहने समर्थकांची असली, तरी आयोगाच्या मते समर्थकांनी उमेदवाराच्या प्रचारावर केलेला तो खर्चच आहे. उमेदवारांना त्यांच्या निवडणूक खर्चाची ठरवून दिलेल्या मर्यादेचा तो भंग ठरत असल्याने, आयोगाने आता प्रचारासाठी किती वाहने वापरावी, याची मर्यादा निश्चित केली आहे. (प्रतिनिधी)