...तरच साखर उद्योगाला संजीवनी मिळेल
By Admin | Published: March 3, 2015 11:55 PM2015-03-03T23:55:51+5:302015-03-03T23:55:51+5:30
साखरेच्या एकूण उत्पादनापैकी तिचा घरगुती व औद्योगिक वापर यामध्ये मोठी तफावत असल्याने साखर विक्रीसाठी दुहेरी नीती अवलंबली, तर साखर उद्योगास संजीवनी मिळेल,
विजयकुमार सैतवाल ल्ल जळगाव
साखरेच्या एकूण उत्पादनापैकी तिचा घरगुती व औद्योगिक वापर यामध्ये मोठी तफावत असल्याने साखर विक्रीसाठी दुहेरी नीती अवलंबली, तर साखर उद्योगास संजीवनी मिळेल, असा विश्वास साखर कारखानदार व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
साखरेच्या एकूण उत्पादनापैकी केवळ २० ते २५ टक्के साखरेचा घरगुती वापर होतो, तर ७० ते ७५ टक्के साखरेचा उपयोग औद्योगिक वापरासाठी जसे आइस्क्रीम, शीतपेय (कोल्ड्रिंक्स) यासाठी होतो. असे असले तरी या दोन्ही कारणांसाठी साखर एकाच भावात विक्री होते. यामध्ये जर साखरेचे रेशनिंग करून घरगुती वापरासाठी वेगळे दर व औद्योगिक वापरासाठी वेगळे दर मिळाले, तर साखर उद्योगांना लाभ होऊ शकेल.
याव्यतिरिक्त ऊस उत्पादकांना द्याव्या लागणाऱ्या एफआयआरसाठी बँकेकडून मिळणारी उचल कर्ज म्हणून न देता ती अनुदान स्वरूपात मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. ती पूर्ण होण्यासह कच्च्या साखरेच्या आयातीवर अनुदान वाढवावे, सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा, अशीही मागणी कारखानदारांकडून केली जात आहे.
पूरक वातावरणाने उत्पादनात वाढ
एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध झाली असताना महाराष्ट्रातही यंदा पोषक वातावरणामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे. यंदा उसाचा पेरा वाढला व त्यात थंडीही अधिक असल्याने उतारा अधिक येत आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्यात भर पडून तिचे भाव कमी होण्यास मदत मिळत
आहे.
४साखरेचे रेशनिंग करून औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणाऱ्या साखरेसाठी वेगळे दर आकारावेत.
४बँकेकडून मिळणारी उचल कर्ज म्हणून न देता ती अनुदान स्वरूपात मिळावी. कच्च्या साखरेच्या आयातीवर अनुदान वाढवावे. सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा.