... तरच भारत की जय नारा देऊ : जलील
By admin | Published: May 16, 2016 01:36 AM2016-05-16T01:36:28+5:302016-05-16T01:36:28+5:30
भारत मातेच्या हातात भगवा रंगाचा दिलेला ध्वज काढून तिरंगा द्यावा, तरच आपण भारत की जयचा नारा देऊ
कोल्हापूर : अपात्र महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी आज, सोमवारी होणार आहे.
तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीलाही येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने ‘तूर्त मनाई आदेश’ दिला आहे. याबाबतही आजच सुनावणी होणार असल्याने दोन्हीही सुनावणीत स्थगिती मिळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला असल्याने कारवाईच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाणार आहे.
महापौरांसह सात जणांच्या जातीच्या दाखल्यास उच्च न्यायालयाने आज, सोमवारी सुनावणीवेळी स्थगिती दिल्यास नव्याने महापौर निवड प्रक्रिया होणार नाही परंतु स्थगिती न मिळाल्यास महापालिका प्रशासनाकडून ही महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. या निवडीची तारीख निश्चित नसली तरी दि. २६ मे नंतर ही निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठीही येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मनाई आदेश दिलेला आहे पण याबाबत आज, सोमवारी सुनावणी होणार असल्याने मनाई आदेश कायम होणार की उठविला जाणार हे स्पष्ट होईल.
विभागीय जातपडताळणी समितीने महानगरपालिका सभागृहातील अश्विनी रामाणे, वृषाली कदम, संदीप नेजदार, दीपा मगदूम, सचिन पाटील, संतोष गायकवाड, नीलेश देसाई या सात नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. या कारवाईच्या विरोधात या सातही जणांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जातीच्या दाखले अवैध ठरविण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. अपात्र नगरसेवकांनी आपल्या याचिकेत महानगरपालिका, विभागीय जातपडताळणी समिती, राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी केले आहे.
अपात्र नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश अधिकतर असल्याने हे अपात्रतेचे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप करत भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याचा पंचनामा करण्याची खेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरविली आहे. त्यामुळे भाजप-ताराराणीचे दोन नगरसेवकही आता ‘रडार’वर आले आहेत.
सभापतिपदाचा मनाई आदेश कायम की उठणार?
नवीन सभापती निवडीसाठी उद्या, मंगळवारी महिला बालकल्याण समितीची सभा जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे; पण नवीन सभापती निवडीला काँग्रेस पक्षाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून तूर्त मनाई आदेश घेतला. त्यावर आज, सोमवारी महानगरपालिका प्रशासन आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यावरच मनाई आदेश कायम राहणार की तो उठविला जाणार हे आजच स्पष्ट होणार आहे.