जिंकू शकेल अशालाच मिळेल राष्ट्रवादीचे तिकीट, शरद पवार यांनी दिले स्पष्ट संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:38 AM2023-08-27T00:38:38+5:302023-08-27T00:39:02+5:30
पवार शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘
कोल्हापूर : अजित पवार, हसन मुश्रीफ यांनी जे केलं ते पक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. ज्यांची जागा निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांनीच ती जागा लढविण्याचा आग्रह धरावा, असे सूत्र निश्चित करावे, पक्षाची भूमिका असून, ती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत मांडणार असल्याचेही पवार
म्हणाले.
पवार शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘ईडी’च्या भीतीने नव्हे, तर अजित
पवार यांची पक्षात घुसमट होत होती म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो, असे मुश्रीफ म्हणतात. अशी विचारणा केल्यावर पवार म्हणाले, त्यांच्या घरी ‘ईडी’चे पथक आल्यावर कोल्हापूरकरांनी निदर्शने केल्याचे मला माहीत आहे; परंतु त्यांनी भाजपसोबत जावे, यासाठी अशी
काही निदर्शने झाल्याचे मला कुठं समजलं नाही. या मंडळींनी (पवार-मुश्रीफ) जे केलं ते पक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही.