शौचालय असेल तरच होता येईल आता नगरसेवक
By admin | Published: December 2, 2015 04:22 AM2015-12-02T04:22:14+5:302015-12-02T04:22:14+5:30
महापालिका, नगरपालिकांचे सदस्य होण्यासाठी स्वत:च्या निवासस्थानी शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : महापालिका, नगरपालिकांचे सदस्य होण्यासाठी स्वत:च्या निवासस्थानी शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
याआधी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराच्या निवासस्थानी शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे आणि त्या सुविधेचा ते नियमितपणे वापर करीत असणे अनिवार्य करण्यात आले होते.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धर्तीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानात शहरांमधील उघड्यावर शौचास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे हा एक महत्त्वाचा कार्यक्र म आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी शहरातील सर्व लोकप्रतिनिधींकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे आणि त्या सुविधेचा नियमितपणे वापर करणे आवश्यक करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पूर्णवेळ शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय तसेच द्विलक्षी अभ्यासक्र म राबविणाऱ्या संस्थेतील पूर्णवेळ शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शिक्षकांप्रमाणेच पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेण्यांचा लाभ
१ एप्रिल २०१४पासून लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.