परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू

By admin | Published: June 30, 2014 02:13 AM2014-06-30T02:13:35+5:302014-06-30T02:13:35+5:30

येथील औष्णिक विद्युत केंद्रात दगडी कोळशाच्या टंचाईमुळे पाचपैकी केवळ दोन संच सुरू आहेत. त्यामुळे 83क् मेगाव्ॉट वीजेची तूट निर्माण झाली आहे.

Only two sets are installed at the Parli Thermic Center | परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू

परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू

Next
>परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रात दगडी कोळशाच्या टंचाईमुळे पाचपैकी केवळ दोन संच सुरू आहेत. त्यामुळे 83क् मेगाव्ॉट वीजेची तूट निर्माण झाली आहे. 
21क् मेगाव्ॉट संच क्रमांक 4 रविवारी सकाळी कोळशाच्या तुटवडय़ामुळे बंद झाला. संच क्रमांक 5 हा 26 जूनपासून बंद आहे. 21क् मेगाव्ॉटचा संच 3 हा 16 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आज दोनच संच सुरू होते. यातून केवळ 3क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती झाली. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संचाची स्थापित क्षमता 1,13क् मेगाव्ॉट आहे. पाचपैकी तीन संच बंद असल्याने 83क् मेगाव्ॉटची तूट आहे. परळीला दररोज 4 संचासाठी 14 हजार टन कोळसा लागतो. परंतु केवळ 7 हजार टन कोळसा उपलब्ध होत आहे. त्यामुळे  मुबलक कोळसा पुरवठा होईर्पयत दोन संच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओडिशा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्राला रेल्वेद्वारे कोळसा पुरविला जातो. सध्या परळीला छत्तीसगढच्या खाणीतून कोळसा पुरवठा केला जात असल्याचे 
औष्णिक विद्युत केंद्रातील सूत्रंनी सांगितले.
मुबलक कोळसा आल्यास हे दोन्ही संच सुरू करण्यात येतील. सध्या नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच सुरू आहेत. रविवारी रात्री 
रेल्वेने कोळसा येण्याची शक्यता 
आहे. हा कोळसा नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील संचासाठी वापरण्यात येणार आहे, असे औष्णिक 
विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता पी. पी. काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
चार वर्षापासून लपंडाव
संच क्र. 4 व 5 हे महिन्यातून दोन वेळा बंद पडतात. बंद पडलेले संच तीन-चार दिवसांत लगेच सुरू होतात. मात्र संच बंद असताना विजेचा मोठा तुटवडा जाणवतो. संच चालू बंदचा हा लपंडाव मागील चार वर्षापासून सुरू आहे.

Web Title: Only two sets are installed at the Parli Thermic Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.