Oops! मुंबई महापालिकेने चुकवला मोदींचा फोन नंबर
By admin | Published: February 10, 2017 01:55 PM2017-02-10T13:55:16+5:302017-02-10T13:55:16+5:30
मुंबई महापालिकेने निवडणूक जाहीरात प्रसिद्ध करताना केलेल्या चुकीची शिक्षा सध्या...
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई महापालिकेने निवडणूक जाहीरात प्रसिद्ध करताना केलेल्या चुकीची शिक्षा सध्या अभिनेत्री अवनी मोदीला भोगावी लागत आहे. मतदार यादीची चौकशी करणा-या फोन कॉल्स आणि मेसेजेसनी अवनी सध्या हैराण झाली आहे. मतदार यादीची विचारणा करणारे फोन कॉल्स आपल्याला का येत आहेत ? हे अवनीला सुरुवातीला कळले नाही.
काही मेसेज वाचून, फोन कॉल्सला प्रतिसाद दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तिचा फोन नंबर निवडणूक जाहीरातीमध्ये छापल्याचे तिला समजले. त्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. व्यावसायिक कारणांमुळे मी माझा फोन बंद ठेऊ शकत नाही. मला मित्र परिवार, दिग्दर्शक आणि इंडस्ट्रीमधून कामासाठी फोन येत असतात असे अवनीने मिड डे शी बोलताना सांगितले.
अवनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करते. अवनीला अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांच्याकडून खुलासा हवा आहे. त्यांच्या स्वाक्षरीने ही जाहीरात प्रसिद्ध झाली. अवनी मोदीचा नंबर चुकून छापला गेला. ज्युनियरकडून ही चूक झाली असून मी चौकशी करीन असे त्यांनी सांगितले. मी माफीचे पत्र पाठवणार आहे असे त्यांनी मिड डे वर्तमानपत्राला सांगितले. महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विजय खाबाले यांनी या चुकीसाठी देशमुख प्रमुख असलेल्या निवडणूक खात्यावर बोट ठेवले आहे.