कांजुरमार्गमध्ये ‘दृश्यम हत्याकांड’ उघड

By admin | Published: July 18, 2016 05:11 AM2016-07-18T05:11:23+5:302016-07-18T05:11:23+5:30

दारूच्या नशेत गरोदर वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या लहान भावाची हत्या केली.

Open the scene of the 'visual massacre' at Kanjur | कांजुरमार्गमध्ये ‘दृश्यम हत्याकांड’ उघड

कांजुरमार्गमध्ये ‘दृश्यम हत्याकांड’ उघड

Next


मुंबई : दारूच्या नशेत गरोदर वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या लहान भावाची हत्या केली. मात्र, भानावर आल्यानंतर अटकेच्या भीतीने हे प्रकरण लपविण्यासाठी कुटुंबीयांनी दारूच्या नशेत काचेवर पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा जबाब देत पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास बंद केला. मात्र, गुन्हे शाखेने या ‘दृश्यम हत्याकांड’ची उकल करत आरोपीला अटक केली आहे.
कांजुर गावात ८ जुलै रोजी हे हत्याकांड घडले. यामध्ये जिटो डिसुजाची हत्या झाली. नायझिल डिसुजा हा पत्नी नमिता, ६२ वर्षीय आई आणि जिटो आणि जिआॅन या दोन भावांसोबत राहतो. ८ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास जिटो दारूच्या नशेत घरी आला. अशात सात महिन्यांची गरोदर असलेल्या वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेला जिटो ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. अशात रागाच्या भरात जिआॅनने स्वयंपाकघरातील चाकूने जिटोवर वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात जिटो खाली कोसळला. तेव्हा जिटोची हत्या झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
यामध्ये आपली चूक नाही. त्यामुळे आपण शिक्षा का भोगायची, या विचाराने कुटुंबीयांनी हे प्रकरण लपविण्यासाठी सर्वांनी एकच जबाब देत, पोलिसांना चकवा देण्याचे ठरविले. त्यानुसार, जिटोला सायन रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत काचेवर कोसळल्याने जिटो जखमी झाल्याची माहिती त्यांनी रुग्णालयाला दिली. बेशुद्धावस्थेत असलेल्या जिटोला १४ जुलै रोजी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कांजुर पोलीस तेथे दाखल झाले. कुटुंबीयांनी सदस्यांचे जबाब नोंदवून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास थांबवला. कुटुंबीयांतील वृद्ध आईसह इतर सदस्यांचे जबाब सारखे असल्याने, पोलिसांना संशय आला नाही. जिटोची अंत्यविधी उरकून कुटुंबीयांनी घरी परतून सुटकेचा निश्वास सोडला.
अशातच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय वर्तविला. सुर्वे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रवीण पाटील आणि संतोष मसदुत यांच्या पथकाने या गुन्ह्यांची उलटतपासणी सुरू केली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून या प्रकरणी हत्येचा संशय वर्तविण्यात आला. त्यामुळे घटनेच्या दिवशी घरात भांडणे झाल्याचे समजताच, तपास पथकाने डिसुजा कुटुंबीयांकडे
चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच जिआॅनने गुन्ह्याची कबुली दिली आणि वरील गुन्ह्याचा सर्व घटनाक्रम उघडकीस आणला. (प्रतिनिधी)
>अंत्यविधी पार पाडला
चाळीतल्या खोल्यांमधून मिळणाऱ्या भाड्यांवर या कुटुंबीयांचा उदनिर्वाह होत असे.
कुटुंबीयांतील वृद्ध आईसह इतर सदस्यांचे जबाब सारखे असल्याने पोलिसांना संशय आला नाही. जिटोची अंत्यविधी उरकून कुटुंबीयांनी घरी परतून सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Open the scene of the 'visual massacre' at Kanjur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.