10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड, कलाकार, खेळाडू, दिव्यांगांना होणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:26 PM2019-01-07T13:26:13+5:302019-01-07T18:48:08+5:30

येत्या 10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्डाची सुरुवात होणार आहे. या बोर्डाचा लाभ कलाकार, खेडाळू, दिव्यांगांना होणार आहे.

Open SSC Board will start in Maharashtra from 10 January | 10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड, कलाकार, खेळाडू, दिव्यांगांना होणार लाभ 

10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड, कलाकार, खेळाडू, दिव्यांगांना होणार लाभ 

Next
ठळक मुद्देकला, क्रीडा तसेच इतर क्षेत्रात रस असलेल्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करता येत नाहीअशा विद्यार्थ्यांसाठी आता येत्या 10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्डाची सुरुवात होणार आहेबोर्डाचा लाभ कलाकार, खेडाळू, दिव्यांगांना होणार आहे

मुंबई - कला, क्रीडा तसेच इतर क्षेत्रात रस असलेल्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता येत्या 10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्डाची सुरुवात होणार आहे. या बोर्डाचा लाभ कलाकार, खेडाळू, दिव्यांगांना होणार आहे.

शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 10 जानेवारी रोजी ओपन एसएससी बोर्ड स्थापन होणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ देता यावा, हा उद्देश ओपन एसएससी बोर्ड स्थापन करण्यामागे आहे.दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ कलाकार, खेळाडू तसेच दिव्यांगांना होणार आहे. 

Web Title: Open SSC Board will start in Maharashtra from 10 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.