मुंबई शहरात पावसाची उघडीप
By admin | Published: June 26, 2015 02:43 AM2015-06-26T02:43:06+5:302015-06-26T02:43:06+5:30
मागील आठवड्यातील शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी दिवसभर उघडीप घेतली.
मुंबई : मागील आठवड्यातील शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी दिवसभर उघडीप घेतली. त्यामुळे पावसाने नाकीनऊ आणलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. दिवसभर मुंबईत सूर्यप्रकाश राहिल्याने पावसाने ओलीचिंब झालेली मुंबई काहीशी कोरडी झाली.
गेल्या २४ तासांत शहरात ४, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १, पूर्व उपनगरात १ अशा दोन ठिकाणी घरांचा भाग पडला. शहरात १, पश्चिम उपनगरात १ अशा दोन ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात १३, पूर्व उपनगरात ७ आणि पश्चिम उपनगरात २० अशा
एकूण ४० ठिकाणी झाडे पडली. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)