Opinion Poll: राज्यात कमळ फुलणार; जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:26 IST2018-10-04T21:25:53+5:302018-10-04T21:26:09+5:30
आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

Opinion Poll: राज्यात कमळ फुलणार; जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार
मुंबई: आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व महत्त्वाचे पक्ष स्वतंत्र लढले, तरीही भाजपाला 22 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेने यापुढील निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा मोठा फटका शिवसेनेला बसताना दिसत आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांना अवघ्या 7 जागा मिळतील. सध्या शिवसेनेचे 18 खासदार आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वतंत्र लढवेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेने ही भूमिका कायम ठेवल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो.
सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीला होईल. काँग्रेेसला 11 तर राष्ट्रवादीला 8 जागांवर यश मिळेल. 2014 मध्ये मोदी लाटेचा तडाखा या दोन्ही पक्षांना बसला होता. त्यावेळी काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालं होतं.