विरोधक उतरले रस्त्यावर!

By Admin | Published: March 30, 2017 04:53 AM2017-03-30T04:53:24+5:302017-03-30T04:53:33+5:30

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार

The opponent got down the road! | विरोधक उतरले रस्त्यावर!

विरोधक उतरले रस्त्यावर!

googlenewsNext

राकेश बोरकुंडवार / सिंदेवाही
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार पुकारत किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला बुधवारपासून सुरुवात केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ते पनवेल अशी तीन टप्प्यांत ही यात्रा असून, पहिला टप्पा सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाठ) या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावातून सुरू झाला. येथील बंडू करकाडे (४२) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी संघर्ष यात्रेतील आमदारांचा ताफा या शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. या शेतकरी कुटुंबावर असलेले कर्ज दूर करण्यासाठी ही संघर्ष यात्रा पुढाकार घेईल, असे या वेळी सांगण्यात आले.
या वेळी बोलताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार उद्योगपतीधार्जिणे असून, उद्योजकांचे कर्ज सरकार माफ करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जाची आठवण आली नाही. सरकारमध्ये असताना केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची विसरण पडली आहे. निव्वळ या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे मागील दोन वर्षांत राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
शिवसेनेच्या आमदारासह १५६ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी रेटून धरली. त्यामुळे सभागृहात आर्थिक बजेटच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळविणे कठीण होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आमदारांना निलंबन करून या सरकारने आपला बचाव केला, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, योगेंद्र कवाडे, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते व जिल्ह्या-जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.


नागपुरात संघर्षच, यात्रेतून नेते गायब
या यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पाहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना, नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे.

मार्गात अनेक ठिकाणी स्वागत
या संघर्ष यात्रेचे मार्गात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. रणरणत्या उन्हातही शेतकरी स्वागतासाठी मार्गावरील अनेका गावांमध्ये प्रतीक्षेत होते. नागपूरवरून या वाहनांचा ताफा येताना कानपा, मूल, चंद्रपुरातील जनता कॉलेज चौक आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले.

मिळेल ते खा, बडेजाव टाळा...
संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेताना डोळ्यावर गॉगल लावू नये, मिळेल ते खावे. या काळात पांढऱ्या खादीचे वस्त्र परिधान करावे, अशा नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यात्रेची सुरुवातच एसी बसमधून झाल्याने चर्चेचा विषय ठरली.

Web Title: The opponent got down the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.