कोट्यवधींच्या खर्चाला विरोध
By admin | Published: December 26, 2016 04:53 AM2016-12-26T04:53:07+5:302016-12-26T04:53:07+5:30
रबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली.
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली. या स्मारकाच्या उभारणीसाठी ३ हजार ६०० कोटींचा निधी खर्च होणार आहे. या स्मारकाच्या कोट्यवधींच्या उधळणीला विरोध करीत, दाखल करण्यात आलेल्या आॅनलाइन याचिकेवर मागच्या दोन दिवसांत तब्बल ५५ हजार सामान्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शिवस्मारकावर होणारी अवाजवी गुंतवणूक ही करदात्यांच्या खिशातूनच होते आहे. त्यामुळे या अवाजवी खर्चाला विरोध करीत मुंबईतील अनेक सुविधांचा विकास करावा, अशी भूमिका घेत शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या आॅनलाइन याचिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या कोट्यवधींच्या गुंतवणुकीऐवजी शिक्षण, अन्न, पायाभूत सुविधांच्या विकास करावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या आॅनलाइन याचिकेची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.
दोन दिवसांत ५५ हजार जणांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर आतापर्यंत ३२ हजार २१४ जणांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भूमिपूजन सोहळ््याच्या निमित्ताने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टिष्ट्वटरवर या याचिकेची चर्चा आहे. (प्रतिनिधी)