विरोधकांनीच केली जमीन विक्रीची शिफारस
By admin | Published: September 8, 2015 02:51 AM2015-09-08T02:51:30+5:302015-09-08T02:51:30+5:30
आदिवासींच्या जमीन विक्रीवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच जमीन विक्रीला परवानगी देण्याच्या शिफारशी केल्या होत्या, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
- खडसेंची माहिती
मुंबई : आदिवासींच्या जमीन विक्रीवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच जमीन विक्रीला परवानगी देण्याच्या शिफारशी केल्या होत्या, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
खडसे म्हणाले, की आदिवासींच्या जमीन विक्रीला उच्च व सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. मात्र तरीही आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जमिनी हडप करू नये म्हणून सरकारने जमीन विक्रीला परवानगी दिलेली नाही. अशी वस्तुस्थिती असताना विरोधी पक्षनेते सरकारवर नाहक टीका करीत आहेत.
महार वतनाच्या जमिनींच्या विक्रीसंदर्भात त्यावर प्रतिबंध नव्हता. कायद्यातच तशी तरतूद आहे, यासंदर्भात नेमलेल्या गवई समितीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे, असे स्पष्ट करताना खडसे
पुढे म्हणाले, की आदिवासींच्या
जमीन विक्रीसंदर्भात संधू
समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील शिफारशींवर शासन पातळीवर विचार सुरू आहे. आदिवासींना जमीन विकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच तशी परवानगी
देण्यात येईल, असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)