संख्याबळाच्या अभावामुळे विरोधकांची माघार
By admin | Published: January 22, 2015 01:28 AM2015-01-22T01:28:46+5:302015-01-22T01:28:46+5:30
विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येकी १४४ मतांचा कोटा आवश्यक असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.
मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येकी १४४ मतांचा कोटा आवश्यक असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.
त्यामुळे शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपाच्या स्मिता वाघ, शिवसंग्रामचे विनायक मेटे व राष्ट्रीय समाज
पक्षाचे महादेव जानकर यांची बिनविरोध निवड झाली. याची घोषणा बाकी आहे.
विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येक जागेची स्वतंत्र निवडणूक घेण्याबाबतची अधिसूचना काढल्याने विजयी उमेदवाराला १४४ मतांची गरज होती.
भाजपाचे १२१ व शिवसेनेचे ६२ सदस्य असल्याने या दोन्ही पक्षाकडे १८३ मतांचा कोटा होता. त्याचवेळी काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ सदस्य विधानसभेत असून ही संख्या ८३ होते.
म्हणजेच दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याकरिता त्यांना ६१ मतांची कमतरता होती.
ही अशक्य बाब आहे. विधान परिषदेवर गेलेल्या मेटे, देसाई, जानकर व वाघ यांची निवृत्तीची तारीख मात्र २०१६ ते २०२० या कालावधीतील आहे. (विशेष प्रतिनिधी)