विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

By admin | Published: August 6, 2016 03:26 AM2016-08-06T03:26:50+5:302016-08-06T03:26:50+5:30

सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला

Opponents trick publicity | विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

Next


मुंबई : सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. आमदारांकडून चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना पुरेसे मानधन हे दिलेच पाहिजे, या शब्दांत त्यांनी आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले.
आमच्या सरकारमध्ये १९ मंत्री कलंकित असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. त्याऐवजी शेती, सिंचन आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली असती तर बरे
झाले असते, असे मुख्यमंत्री
म्हणाले.
विरोधकांनी सहकार्य केले नसले तरी सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविणे, मुंबईसारखे शहर वायफाय सिटी करणे, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढणारे विधेयक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकण्याची परवानगी देणारे पणन विधेयकही मंजूर केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष
प्रतिनिधी)
>हे सरकार म्हणजे खोटे बोला रेटून बोला
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हे, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने चालले असून आम्ही मंत्र्यांवर केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी थेट उत्तर दिलेले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला.
महाडसारख्या दुर्घटनेबद्दलही सरकार गंभीर दिसले नाही. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन २० महिन्यांत पूर्ण केलेले नाही. कोपर्डीच्या घटनेवरून सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. पूर्ण अधिवेशनात सरकार बॅकफुटवर होते, असे ते म्हणाले.

Web Title: Opponents trick publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.