संधीसाधूंनीच केले पक्षांतर

By admin | Published: June 8, 2017 02:14 AM2017-06-08T02:14:27+5:302017-06-08T02:14:27+5:30

सरकार बदलल्यामुळे काही संधीसाधू लोक पक्ष बदलवून भाजपमध्ये गेले. अशा संधीसाधू लोकांची काँग्रेसला कधीच गरज भासणार नाही.

Opportunities have been done by monsters | संधीसाधूंनीच केले पक्षांतर

संधीसाधूंनीच केले पक्षांतर

Next

अक्षय चोरगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळा सुरू होण्यासाठी आठवडा शिल्लक असल्याने दप्तर, वॉटरबॅग, शूज, छत्री, रेनकोट, वह्या, पुस्तके आणि गणवेश खरेदीसाठी पालकांसह मुलांची लगबग उडाली आहे. मुंबईतील मोठ्या मार्केटसह लहान बाजारांत शालेय साहित्यासाठी गर्दी होत असून, यात क्रॉफर्ड मार्केट, दादर, मशिद बंदर, कुर्ला आणि मानखुर्द या बाजारपेठांचा समावेश आहे.
शालेय साहित्याची खरेदी करताना, कार्टुन्सची छायाचित्र असलेल्या साहित्यांवर अधिक भर दिला जात आहे. दप्तर, टिफीन, वॉटरबॅगला आणि कंपासपेटीवर कार्टुन्सची छायाचित्र असून, या साहित्याला अधिक मागणी आहे. यामध्ये थ्रीडी चित्रे आणि साधी चित्रे असणारे साहित्य, असे दोन प्रकार आहेत, असे कुर्ला येथील विक्रेत्यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्या की, मुलांना नवा गणवेश आणि वह्या-पुस्तकांसह नवी कंपासपेटी, वॉटरबॅग, टिफीन बॉक्सही हवा असतो. त्यात आपल्याकडे सर्वांपेक्षा हटके बॅग, हटके कंपासपेटी असावी, असा मुलांचा आग्रह असतो. मुलांच्या या अपेक्षाला खऱ्या उतरतील, अशा थ्रीडी चित्रे असलेल्या साहित्यांनी बाजार फुलला आहे.दादर येथील मार्केटमध्ये कार्टुन्सची चित्रे असलेली दप्तरे दाखल झाली आहेत. परंतु हे साहित्य यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
साहित्याचे दर
कंपासपेटी (साधी) : २० ते ४० रुपये
कंपासपेटी (कार्टुन्स चित्र) : ३० ते १२० रुपये
कंपासपेटी
(थ्रीडी चित्र) : ६० ते १५० रुपये
टिफीन बॉक्स (साधा) : ३० ते ६० रुपये
टिफीन बॉक्स
(कार्टुन्स चित्र) : ५० ते १०० रुपये
वॉटर बॅग (साधी) : ३० ते ५० रुपये
वॉटर बॅग
(कार्टुन्स चित्र) : ५० ते ८० रुपये
नायलॉनची बॅग : २०० ते ४०० रुपये
चिनी बॅग (साधे चित्र) : ५०० ते ६०० रुपये
चिनी बॅग (थ्रीडी चित्र) : ७०० ते १५०० रुपये
कार्टुन्सची चित्रे असलेल्या वॉटरबॅग, टिफीन बॉक्स, कंपासपेट्या यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाळा सुरू व्हायला अद्याप एक आठवडा उरला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ही मागणी वाढेल. यांच्या किमती ३० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत आहेत.
- अजयसिंग चौटाला, विक्रेता
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वह्या-पुस्तकांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- दीपक निकम,
व्यवस्थापक महाराष्ट्र स्टोअर्स, कुर्ला
कार्टुन्सची चित्रे असलेल्या साहित्यांना मागणी आहे. लहान मुले अशी चित्रे असलेल्या साहित्यासाठी हट्ट करत आहेत. कंपासपेटी, वॉटरबॅग, टिफीन बॉक्सच्या किमती वाढलेल्या नसल्या, तरी बॅगच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- सुभाष यादव, विक्रेता
पुस्तकांच्या किमतींमध्ये वाढ झालेली नाही. यावर्षी आम्ही वह्या मागील वर्षीच्या किमतीतच विकत आहोत; परंतु दरवर्षी वह्यांच्या किमतीत एका वहीमागे चार ते पाच रुपये वाढवले जातात.
- आशा आवटी, भारत बुक डेपो, गिरगाव

Web Title: Opportunities have been done by monsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.