राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत तरुणांना संधी

By admin | Published: July 8, 2014 12:42 AM2014-07-08T00:42:42+5:302014-07-08T00:42:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असून, त्यात तरुण चेह:यांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.

The opportunities for youth in NCP's working committee | राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत तरुणांना संधी

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत तरुणांना संधी

Next
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असून, त्यात तरुण चेह:यांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.
समीर भुजबळ, संजीव नाईक आणि आनंद परांजपे हे तीन तरुण खासदार अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. जुन्या कार्यकारिणीत मोठय़ा प्रमाणात बदल केले जातील, अशी माहिती आहे. एकेकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेले रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनाही संधी दिली जाऊ शकते.  अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणो नीलय नाईक यांचीही वर्णी लागेल. बीडच्या उषा दराडे, अमरावतीच्या सुरेखा ठाकरे, जालन्याच्या कीर्ती उडान या महिलांचा समावेश होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी अंतर्गत अनेक ठिकाणी गटबाजी उफाळून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या राज्यभर निर्धार मेळावे घेऊन गटबाजी शमविण्याचा प्रय} करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यकारिणीत काही चेह:यांना स्थान दिले जाईल. राष्ट्रवादीतील काही नेते भाजपा किंवा शिवसेनेच्या गळाला लागू शकतात हे लक्षात घेऊन संभाव्य फूट टाळण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टाकल्याचेही सूत्रंनी सांगितले.  (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: The opportunities for youth in NCP's working committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.