अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:42 AM2023-12-04T06:42:38+5:302023-12-04T06:42:59+5:30
आंतरजिल्हा बदलीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी काढला होता. मात्र, या आदेशाला खो देत ग्रामविकास विभागाने २२ नोव्हेंबर रोजी पत्र काढले.
मुंबई : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू झाला असून, यात २०२२ मध्ये केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी अखेर मिळाली. तसा नवीन आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे.
आंतरजिल्हा बदलीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी काढला होता. मात्र, या आदेशाला खो देत ग्रामविकास विभागाने २२ नोव्हेंबर रोजी पत्र काढले. यानुसार फक्त २०२२ मध्ये अर्ज केलेल्यांनाच संधी होती.
बदलीस पात्र कोण?
जे शिक्षक कर्मचारी ३० जून, २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी.
२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अर्ज केले होते; परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना सन-२०२२ मध्ये भरलेल्या अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास संधी.
न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी.
काय सांगतो आदेश?
आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबवून २०२२ मध्ये अर्ज केलेल्यांना त्यात बदल करण्याची संधी दिली जाईल. तसेच अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळेल.