मंगळ-शुक्र ग्रहांची युती मंगळवारी पाहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:16 AM2021-07-12T11:16:24+5:302021-07-12T11:19:52+5:30
सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पृथ्वीच्या शेजारी असणारे शुक्र आणि मंगळ या ग्रहांची युती होणार आहे.
शीतलकुमार कांबळे -
सोलापूर: खगोलप्रेमींना मंगळ आणि शुक्र ग्रहांची युती पाहण्याची संधी मिळणार आहे. मंगळवार, १३ जुलै रोजी दुर्बिणीचा वापर न करता हे दृश्य पाहता येणार आहे.
सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पृथ्वीच्या शेजारी असणारे शुक्र आणि मंगळ या ग्रहांची युती होणार आहे. सूर्यास्त झाल्यानंतर हे दृश्य आकाशात पाहता येईल. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त अर्धा अंश अंतरावर असतील. आकाशात ढग नसल्यास साध्या डोळ्यांनी ही घटना पाहता येणार आहे. शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ येताहेत.
मंगळवारी शुक्र आणि मंगळ ग्रह जवळ येणार आहेत. या दोन्ही ग्रहांजवळ चंद्रही दिसेल. सूर्यास्तापासून रात्री आठ ते साडेआठपर्यंत ही खगोलीय घटना पाहता येईल.
- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, विज्ञान केंद्र सोलापूर