फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:34 AM2018-08-15T05:34:35+5:302018-08-15T05:34:48+5:30

Opportunity for the students passing in the re Exam - Vinod Tawde | फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी - विनोद तावडे

फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी - विनोद तावडे

Next

मुंबई : आजवर फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नव्हता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याार्थ्यांना दिलासा दिला असून या विद्याार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
तावडे म्हणाले, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची राज्य शासनामार्फत जुलै महिन्यात
फेरपरीक्षा घेण्यात येते. परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याअखेरपर्यंत येतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १५ आॅगस्टपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपविणे आवश्यक आहे. मात्र यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना व्यावसायिक
अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळत नव्हती, त्यामुळे राज्य शासनामार्फत याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका सादर केली
होती. याचिकेत फेरपरीक्षेत पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३१ आॅगस्ट अशी मुदत मिळावी अशी विनंती होती. सर्वोच्च न्यायालयाने ती
मान्य केल्याने या विदयार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे .यावर्षी फेरपरीक्षेस विज्ञान शाखेतून १८,२७८ विदयार्थी बसले असून आता या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे.

Web Title: Opportunity for the students passing in the re Exam - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.