सत्तेत असताना विरोधकांनी तिजोºयांचे सिंचन केले - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:40 AM2017-12-18T02:40:25+5:302017-12-18T02:40:34+5:30

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोºयांचे सिंचन केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 Opposition irrigation projects in power - Chief Minister | सत्तेत असताना विरोधकांनी तिजोºयांचे सिंचन केले - मुख्यमंत्री

सत्तेत असताना विरोधकांनी तिजोºयांचे सिंचन केले - मुख्यमंत्री

Next

बुलडाणा/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोºयांचे सिंचन केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह नऊ सिंचन प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या ११ कामांचा आणि अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २० हजार कोटींची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला. म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणाºया कालावधीत या निधीचा पूर्ण विनियोग करून, सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतकºयांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती, त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच सभेत गोंधळ-
नांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला.
निदर्शकांनी काळे झेंडे दाखवले. तर काहींनी खुर्च्याही फेकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच काही युवकांनी हातातील काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था अपुरी पडल्याने खुर्चीवर बसलेल्या काही लोकांना वेळेवर उठावे लागले. त्यामुळे त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. पोलीस व भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांना शांत केले व त्यांची बसण्याची व्यवस्था केली.
जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी प्रेमलता सोनुने यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ आंदोलन केले. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. राज्यातील शेतकºयांच्या प्रश्नांवर शासन गंभीर नाही, पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे आदी मुद्द्यांवर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच स्थानबद्ध केले.

 

Web Title:  Opposition irrigation projects in power - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.