केरळातील हत्यांना विरोध

By Admin | Published: March 2, 2017 12:49 AM2017-03-02T00:49:36+5:302017-03-02T00:49:36+5:30

केरळमध्ये मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे निर्घृण हत्याकांड चालविले

Opposition to the killings in Kerala | केरळातील हत्यांना विरोध

केरळातील हत्यांना विरोध

googlenewsNext


पुणे : केरळमध्ये मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे निर्घृण हत्याकांड चालविले असून, त्याला तेथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे केरळमधील कम्युनिस्ट विचारांचे सरकार बरखास्त करून, राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली.
या हत्यांचा निषेध करण्यासाठी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धिक्कार सभेचे आयोजन करण्यात आले होते. केरळमधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याविरोधात संघाने देशव्यापी निदर्शने केली. त्या पाठोपाठ हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, योगेश मुळीक, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्वरूपवर्धिनीचे सागर शिंदे, भारत-भारतीचे चरणजित सहानी, छावा संघटनेचे धनंजय जाधव,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बागेश्री मंठाळकर, हिंदू सेवा
समितीचे रमेशजी आणि भारतीय मजदूर संघाचे उदय पटवर्धन या वेळी उपस्थित होते.
केरळमध्ये माकपचे कार्यकर्ते इतर पक्ष-संघटनांना कामच करू देत नाहीत. कन्नुर जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांत १८ संघ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. मार्क्सवादी कार्यकर्ते संघ कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक करतात, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा आरोप केरळचे भारत-भारतीचे कार्यकर्ते रमेश कळंबोली यांनी या वेळी केला.
>विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. तलवार, बंदुकीने विचार कधीच मरत नाहीत. कम्युनिस्ट पक्षानेही आपले विचार जरूर मांडावेत; मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संघ-भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे केरळमध्ये भय आणि दहशतीचे वातावरण आहे.
-गिरीश बापट, पालकमंत्री
केरळमधील हिंसाचार जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तेथील हिंसाचाराच्या घटनांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्वत: लक्ष ठेवून आहेत; तसेच मानवाधिकार आयोगानेही तेथील परिस्थितीचा अहवाल मागविला आहे. ‘काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे’ अशी खंत उदय पटवर्धन यांनी व्यक्त केली.
- अनिल शिरोळे, खासदार

Web Title: Opposition to the killings in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.