बीडमधून पंकजा मुंडेंसाठी नव्हे, तर 'या' नेत्यासाठी होतेय विरोधीपक्ष नेतेपदाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 03:34 PM2019-12-06T15:34:03+5:302019-12-06T15:34:56+5:30
विधानसभेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. तर विधान परिषदेत भाजपला कणखर विरोधीपक्षनेत्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांच्या रुपाने भाजपची ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र आता धस समर्थकच आपल्या नेत्यासाठी विधान परिषद मागत आहेत. त्यामुळे मुंडे आणि धस यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई -बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुरेश धस यांच्या समर्थकांना आता आपल्या नेत्यासाठी विरोधीपक्षनेतेपदाची आस लागली आहे. बीड जिल्हा परिषद भाजपला मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे धस आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजपला विरोधात बसावे लागले आहे. तर पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्याचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होत आहे. पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषद देण्यात येऊ शकते. तर सुरेश धस आधीच विधान परिषद आमदार आहेत.
दरम्यान विधानसभेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. तर विधान परिषदेत भाजपला कणखर विरोधीपक्षनेत्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांच्या रुपाने भाजपची ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र आता धस समर्थकच आपल्या नेत्यासाठी विधान परिषद मागत आहेत. त्यामुळे मुंडे आणि धस यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.