विरोधी पक्षनेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर
By Admin | Published: September 9, 2015 12:38 AM2015-09-09T00:38:23+5:302015-09-09T00:38:23+5:30
मराठवाड्यातील दुष्काळी कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दि. ९ सप्टेंबरला लातूर,
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळी कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दि. ९ सप्टेंबरला लातूर, १० सप्टेंबरला परभणी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत.
९ सप्टेंबर सकाळी ९ वाजता त्यांचे लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी १० वाजता ते लातूर तालुक्यातील मौजे साखरा येथे, तर सकाळी ११.१५ वाजता रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. दुपारी १२.१५ वाजता ते रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता लातूर मनपाच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. सकाळी ११.३० वाजता याच तालुक्यातील साळापुरी येथील आत्महत्या करणारे शेतकरी गुलाबराव घाडगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. दुपारी १२.१५ वाजता ते दैठणा तर दुपारी १ वाजता पोखर्णी नृसिंह येथे दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी २ वाजता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेईल व दुष्काळी कामांसंदर्भात निवेदन सादर करेल.