सुभाष देसार्इंच्या परिचयावरून विधान परिषदेत टोलेबाजी

By admin | Published: March 12, 2015 01:33 AM2015-03-12T01:33:35+5:302015-03-12T01:33:35+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी सकाळी नवनिर्वाचित सदस्य महादेव जानकर यांचा परिचय सभागृहाला करुन देण्यात आला

Opposition in the Legislative Council from the introduction of Subhash Desai | सुभाष देसार्इंच्या परिचयावरून विधान परिषदेत टोलेबाजी

सुभाष देसार्इंच्या परिचयावरून विधान परिषदेत टोलेबाजी

Next

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी सकाळी नवनिर्वाचित सदस्य महादेव जानकर यांचा परिचय सभागृहाला करुन देण्यात आला. मात्र, सुभाष देसाई सभागृहात न आल्याने त्यांचा परिचय करुन देण्यात आला नव्हता. उद्योग मंत्री म्हणून विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणारे देसाई विधान परिषदेत का येत नाहीत, दुस-या रांगेत बसावे लागल्याने ते नाराज आहेत का, अशा प्रश्नांचा भडिमार करत विरोधकांनी आज शिवसेनेवर राजकीय टोलेबाजी केली. विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सभागृहात एकही कॅबिनेट दर्जाचा मंत्री उपस्थित नसल्याने दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य महादेव जानकर यांचा परिच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करुन दिला. परंतु मागील तीन दिवसांत ज्यांचे नाव नवीन सदस्य म्हणून परिचयासाठी प्रामुख्याने होते ते सुभाष देसाईच सभागृहात नव्हते. ते नेमके कुठे आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केली. दुस-या रांगेत बसावे लागल्याने ते नाराज आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Opposition in the Legislative Council from the introduction of Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.