भगवानगडावर राजकीय सभांना विरोध
By admin | Published: September 21, 2016 05:21 AM2016-09-21T05:21:37+5:302016-09-21T05:21:37+5:30
भगवान गडावर विजयादशमीच्या दिवशी राजकीय सभांना परवानगी देऊ नये
अहमदनगर : भगवान गडावर विजयादशमीच्या दिवशी राजकीय सभांना परवानगी देऊ नये, असे गडाच्या विश्वस्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पुढे कायम ठेवावी अशी पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे़
दसरा मेळाव्याला मी येणार. परंतु गडाला गालबोट लागू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ ग् परवानगी दिली तर घडणाऱ्या घटनांची जबाबदारी प्रशासनाची
असेल असे पत्र दिल्याने प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे़ (प्रतिनिधी)
>समझोत्याचा प्रयत्न
शास्त्री यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंडे समर्थकांनी सांगितले़ गडावर राजकीय व्यक्तींच्या येण्याजाण्यातून याआधीही वाद उद्भवले आहेत़ आता ११ आॅक्टोबर रोजी गडावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़