विरोधकांचा आरोप बिनबुडाचा - खडसे

By Admin | Published: January 9, 2016 04:09 AM2016-01-09T04:09:03+5:302016-01-09T04:09:03+5:30

‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून,

Opposition's allegation is unimpressive - Khadse | विरोधकांचा आरोप बिनबुडाचा - खडसे

विरोधकांचा आरोप बिनबुडाचा - खडसे

googlenewsNext

मुंबई : ‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून, उलट मदतीसाठी पात्रतेची अट ५० टक्क्यांहून ३३ टक्क्यांपर्यंत शिथिल केल्याने त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय, मदतीच्या रकमेतही वाढ केली आहे,’ असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे म्हणाले, २०१४ साली कोेरडवाहू शेतीसाठी ४,५०० रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती. त्यात वाढ करून या वर्षी ही मदत ६००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली. तर ओलिताखालील शेतीस तेव्हा ९ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती.
ती या वर्षी १३,५०० रुपये
प्रति हेक्टर देण्यात आली
आहे. बहुवर्षीय फळपिकांसाठीसुद्धा गेल्या वर्षी १२ हजार रुपये
मदत देण्यात आली होती ती
या वर्षी १८,००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली.
दुष्काळासह इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे म्हणजेच गारपीट, पूर, कीटकांचा प्रादुर्भाव आदींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी आता हेच सुधारित दर ठेवण्यात आले असून, मदतीस पात्र होण्यासाठीसुध्द्धा ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करून ती ३३ टक्क्यांवर आणण्यात आल्याचे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळातच कमी मदत दिली गेली. त्यामुळे विरोधकांनी कांगावा सुरू केला आहे, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition's allegation is unimpressive - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.