विरोधीपक्षांचा एल्गार, संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 10:16 PM2017-04-14T22:16:15+5:302017-04-14T22:16:15+5:30
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्यावतीने उद्यापासून संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात होणार
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.14 - शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्यावतीने उद्यापासून संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात होणार आहे. बुलडाणा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे.
ही यात्रा बुलडाणा,जळगाव,धुळे, नंदुरबार, नाशिक,पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, 18 एप्रिल रोजी ठाण्याच्या शहापूर येथे दुस-या टप्प्याचा समारोप होईल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शेतकरी कामगार पक्ष,समाजवादी पक्ष,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्ष या यात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपा-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेमध्ये विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार सहभागी होणार आहेत.