अत्याचारमुक्त पुणो असावे
By admin | Published: July 13, 2014 12:03 AM2014-07-13T00:03:30+5:302014-07-13T00:03:30+5:30
‘पुरुषांवर अन्यायच होत नाही असे नाही; मात्र ज्या प्रमाणात स्त्रियांचा छळ होत आहे, त्यातुलनेत पुरुषांचा छळ हे प्रमाण नगण्यच आहे.
Next
पुणो : ‘पुरुषांवर अन्यायच होत नाही असे नाही; मात्र ज्या प्रमाणात स्त्रियांचा छळ होत आहे, त्यातुलनेत पुरुषांचा छळ हे प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे स्त्रियांविरुद्धच्या छळासाठी एक पाऊल म्हणून कामाच्या ठिकाणी विशाखा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी व्हायलाच हवी. भविष्यात एकाही महिलेवर अन्याय-अत्याचार होत नाही, अशी पुण्याची ओळख व्हावी आणि पुणो महिला सुरक्षेसाठी इतर शहरांना मार्गदर्शक ठरावे, अशी अशी आशा खासदार अनू आगा यांनी केली.
पुणो श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कामाच्या ठिकाणी होणा:या लैगिंक छळासंबंधी जागृती व महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅप्स या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कमिन्स इंडिया लिमिटेडचे संचालक प्रदीप भार्गव, सीमा या संघटनेच्या अॅड. वैशाली भागवत, पद्मिनी सुंदरम आदी उपस्थित होत्या.
आगा म्हणाल्या, ‘‘वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक समाजाने स्त्रियांना गृहीत धरले आहे. ती स्त्री जर प}ी या स्वरूपात असेल, तर मग ही स्वामित्वाची भावना अधिकच बळावलेली समाजातील विविध स्तरांतून दिसली आहे. त्यातूनच स्त्रियांचा छळ हेही गृहीतच धरले गेले आहे. त्यामुळे वृत्तपत्र व प्रसारमाध्यमे ही समाजासाठी प्रभाव पाडणारी असतात; त्यामुळे त्यांनी हे विषय हाताळून जागृती निर्माण केली पाहिजे.’’
पद्मिनी सुंदरम यांनी स्त्रियांनी अडचणीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी मोबाईल अॅप्स वापरण्याविषयी मार्गदर्शन
केले.
भार्गव यांनी सीमा संघटनेविषयी माहिती दिली. या वेळी अध्यक्ष महेंद्र बडदे व सरचिटणीस सुनीत भावे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुरुष सहका:याने
घाबरू नये
4हा कायदा केवळ स्त्रियांच्याच बाजूने आहे, असे मानून पुरुष सहकार्यानी घाबरण्याचे कारण नाही. स्त्रीने तक्रार केली, की त्यात तथ्यच आहे, असे होत नाही. तक्रार झाली म्हणजे घटना घडलीच असेल, असे नाहीये. त्यामुळे स्त्रीला तो पुराव्यानिशी सादर करावा लागतो; त्यामुळे पुरुष सहका:यांना भीतिदायक असे काहीही नाही. खोटी तक्रार झाल्याचे सिद्ध झाल्यास स्त्रीवरही कारवाईची तरतूद आहे, असे आगा म्हणाल्या.