ओरल सलाईनवर संक्रात!
By admin | Published: August 24, 2016 06:02 PM2016-08-24T18:02:35+5:302016-08-24T18:02:35+5:30
शुध्द नैसर्गिक आणि शक्तीवर्धक असलेल्या ओल्या नारळावर (ओरल सलाईन) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच संकट कोसळले आहे
अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 24 : शुध्द नैसर्गिक आणि शक्तीवर्धक असलेल्या ओल्या नारळावर (ओरल सलाईन) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच संकट कोसळले आहे. कधीकाळी भाव खाणारे ओले नारळ आता, केवळ दहा रुपयांमध्ये विकल्या जात आहे. त्यामुळे या नारळाचे विक्रेत्यांची मजुरीही निघणे अवघड झाले आहे.
कोणतीही भेसळ करता येत नसल्याने, ओल्या नारळाचे पाणी शुद्ध आणि शक्तीवर्धक पेय म्हणून मानल्या जाते. नारळ पाणी पिल्यानंतर तात्काळ स्फूर्ती येते. त्यामुळे अलिकडच्या काळात ओले नारळ ह्यओरल सलाईनह्ण म्हणूनही नावारुपाला येत आहे. नारळ पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने, या नारळाला मोठी मागणी आहे. आबालवृध्द , प्रामुख्याने रुग्णांकडूनही या नारळालाच पसंती मिळते. या पार्श्वभूमीवर लहान ओल्या नारळाचे दर साधारपणे २० रुपयांच्या वर असतात.
तर आकाराने मोठे असेलेले नारळ ३० रुपयांपर्यंत विकले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्याने, ओल्या नारळाचे भाव गडगडले आहे. केवळ दहा रुपयाला बाजारात ओले नारळ उपलब्ध आहे. त्यामुळे या नारळाच्या विक्रेत्यांना चांगलाच फटका बसत आहे. कमी भावात नारळ विकल्या जात असल्याने, नारळ विक्रेत्यांची मजुरीही निघणे दुरापास्त झाले आहे.
उन्हाळ्यात ३० रुपयांपर्यंत नारळाची विक्री केली. आता १० रुपयांना नारळ विकल्या जात आहे. यामुळे मेहनतीला मोल मिळत नाही.
-सोनू शहा
नारळ विक्रेता, खामगाव.