विदर्भातील संत्रा उत्पादकांना मिळणार दज्रेदार कलमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:38 AM2017-12-20T00:38:14+5:302017-12-20T00:42:37+5:30
विदर्भातील संत्रा उत्पादकांना दज्रेदार व आवश्यकतेनुसार संत्र्याच्या कलमा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संत्रा महोत्सवात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीच्या रोपवाटिकेचे नियोजन व प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे.
राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विदर्भातील संत्रा उत्पादकांना दज्रेदार व आवश्यकतेनुसार संत्र्याच्या कलमा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संत्रा महोत्सवात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीच्या रोपवाटिकेचे नियोजन व प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील सर्वाधिक १ लाख ५0 हजार हेक्टर संत्र्याचे क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भाच्या नागपुरी संत्र्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ख्याती आहे. भौगोलिक निर्देशांक मिळाल्यानंतर या संत्र्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यासाठी गुणवत्ता व दज्रेदार कलमा संत्रा उत्पादक शेतकर्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. विदर्भात नागपूर जिल्हय़ात नागपूर व काटोल येथे प्रादेशिक संत्रा रोपवाटिका केंद्र आहे; पण या रोपवाटिकांमध्ये दरवर्षी प्रत्येकी ४५ ते ५0 हजार एवढय़ाच कलमांची निर्मिती केली जाते. तथापि, यापेक्षा मागणी अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांनी रोपवाटिकेसाठी दोन कोटी देण्याचे जाहीर केले. रोपवाटिकेचे क्षेत्र वाढल्यास दीड लाखांपर्यंत दरवर्षी संत्रा कलमांची निर्मिती करता येईल, असा कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे.
विदर्भात मागील पाच वर्षे इंडो-इजराइल संत्रा प्रक ल्प राबविण्यात आला. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतावर या प्रक ल्पांतर्गत गादीवाफा तंत्रज्ञान राबविण्यात आले. ६ बाय ३ अंतरावर संत्रा कलमा लागवड तसेच त्यासाठी ठिबक व अन्नद्रव्य व्यवस्थानाबाबत शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात आले. यात भरघोस फायदा झाला असून, जेथे ९ ते १0 टन उत्पादन होत होते. तेथे इंडो-इजराइल प्रकल्प तंत्रज्ञान अंतर्भावाने हेक्टरी संत्रा उत्पादन ३२ टनावर पोहोचले. याचनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या प्रकल्पाच्या तंत्रज्ञानाची शिफारस शासनाला केली असून, शासनाने याचा अंतर्भाव केला. त्यामुळे यावर्षीपासून मनरेगांतर्गत हा प्रकल्प राबविण्याचे ठरले आहे.
संत्रा फळ पिकावर ‘डिंक्या’(फायटोपथेरा) बुरशीजन्य रोगामुळे संत्रा झाडांचा मोठय़ा प्रमाणात र्हास होतो. तथापि, इंडो-इजराइल तंत्रज्ञानामुळे फायटोपथेरा रोगाला तो सहसा बळी पडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी विदर्भात जवळपास १ हजार ५00 हेक्टरवर इंडो-इजराइल तंत्रज्ञानांतर्गत संत्रा लागवड करण्यात आली.
विदर्भातील शेतकर्यांना दज्रेदार संत्रा कलमा उपलब्ध होऊन संत्रा क्षेत्र वृद्धी व्हावी, यासाठी समृद्ध रोपवाटिका तयार करण्यात यावी, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यानुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. डी. एम. पंचभाई,
विभाग प्रमुख, उद्यान विद्या विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.