आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला

By admin | Published: November 7, 2016 02:29 AM2016-11-07T02:29:28+5:302016-11-07T02:29:28+5:30

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण; रविवारी आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला.

The order for the cancellation of the cancellation of the ashram school was shocked | आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला

आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला

Next

खामगाव, दि. ६- पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाने या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली आहे. रविवारी आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला.
तालुक्यातील पाळा येथील आश्रमशाळेत १0 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाले. ही घटना उघडकीस येताच आदिवासी विभाग मंत्री विष्णू सावरा, राज्याचे आदिवासी आयुक्त राजेश जाधव यांनी शुक्रवारी पाळा येथे आश्रमशाळेला भेट दिली. पाहणीदरम्यान शाळेतील सुविधा, प्रशासन याबाबत आदिवासी विकास मंत्री सावरा तेथे कोणत्याही सुविधा नसल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी शुक्रवारीच खामगावात आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाळा येथील श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूरद्धारा संचालित स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आदिवासी आयुक्त जाधव यांनी शनिवारी आश्रमशाळा मान्यता रद्दचा आदेश काढला. रविवारी सदर आदेश धडकला आहे.

आठ कर्मचार्‍यांचे निलंबन
पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेच्या मान्यता रद्दची कारवाई आदिवासी आयुक्तांनी केली असता शाळेतील आठ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबनामध्ये मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

Web Title: The order for the cancellation of the cancellation of the ashram school was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.