बालगृहांच्या तपासणीचे आदेश
By Admin | Published: July 22, 2016 04:20 AM2016-07-22T04:20:51+5:302016-07-22T04:20:51+5:30
राज्यातील बालगृहांच्या तपासणीसंदर्भातील संपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल
मुंबई : राज्यातील बालगृहांच्या तपासणीसंदर्भातील संपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
नांदेड येथील सुनिता बालगृहातून एका बालकाच्या झालेल्या विक्रीसंदर्भातील प्रश्न वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा, भारती लव्हेकर यांनी उपस्थित केला होता.त्यावर मुंडे म्हणाल्या की, बालगृहांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये बालगृहांची सद्य:स्थिती, आवश्यक असणार्या बाबींचा समावेश आहे. शासनाने राज्यातील बालगृहे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
बालगृहांमध्ये नियमबाह्य मुलांना प्रवेश देण्यात आले असतील तर त्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याशिवाय शिशुगृह, बालगृहातील मुलांना चांगल्या
सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सुनिता बालगृह या खासगी संस्थेच्या तत्कालीन अधीक्षिका सत्यश्री खाडे यांच्यावर बालकाची विक्र ी केल्याचा गुन्हा ताडदेव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.