सोलापूरमधील आठ संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By admin | Published: March 18, 2017 12:50 AM2017-03-18T00:50:54+5:302017-03-18T00:50:54+5:30
सोलापूर जिल्ह्यातील आठ नर्सिंग कॉलेजनी शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये ३ कोटी ८० लाख रुपयांची अनियमितता केल्याचे विशेष चौकशी पथकाच्या चौकशीत आढळले
- यदु जोशी, मुंबई
सोलापूर जिल्ह्यातील आठ नर्सिंग कॉलेजनी शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये ३ कोटी ८० लाख रुपयांची अनियमितता केल्याचे विशेष चौकशी पथकाच्या चौकशीत आढळले असून या संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सामाजिक
न्याय विभागाने दिले आहेत.तसेच ही रक्कम संबंधित संस्थांकडून वसूल करण्यासही सांगितले आहे.
राज्यातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृती/शैक्षणिक शुल्क वाटपात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथकाची स्थापना केली होती. या पथकाने केलेल्या चौकशीत सोलापूर जिल्ह्यातील आठ संस्थांमध्ये अनियमिता आढळली. सामाजिक न्याय विभागाच्या लातूर येथील सहसंचालकांनीही तसा अहवाल चौकशी पथकाला दिला होता.
केंद्र सरकारच्या नियमानुसार नर्सिंग कॉलेजना शिष्यवृत्ती लागू नसतानाही ती देण्यात आली. तसेच, बोगस, जादाचे विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटली या व इतर प्रकरणात सदर आठ संस्थांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
संस्थेचे नाव अनियमितता व गैरव्यवहाराची रक्कम
मल्लिकार्जून हेल्थ केअर रिसर्च सेंटर, यशोधरा नर्सिंग इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग, सोलापूर
रु.४२८४२५४
धनराजगिरजी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग स्कूल, पार्कचौक, सोलापूर
रु.१०७१७२८७
एस.पी.इन्स्टिट्यूट
आॅफ नर्सिंग सोलापूर
रु.१९०३६६४
मार्कंडेय सोलापूर सहकारी
रुग्णालय नर्सिंग ट्रेनिंग स्कूल
पच्चापेठ, सोलापूर
रु.१८१९८५३
कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट
आॅफ नर्सिंग एज्युकेशन, कुंभारी
ता.दक्षिण सोलापूर.
रु.२५९७४७५
विजयसिंह मोहिते पाटील
कॉलेज आॅफ नर्सिंग, अकलुज, जि.सोलापूर
रु.४३०५९४५
सरदारबी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग स्कूल, व्ही.एम.कॅम्पस, सीमोल्लंघन पाद रोड, मोहोळ.
रु.४९५५३६५
राजमाता जिजाऊ
नर्सिंग स्कूल : पंढरपूर.
रु.७५१६०२२