नरेगातील गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश, विरोधकांची दोषींवर कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:21 AM2018-07-13T06:21:54+5:302018-07-13T06:23:27+5:30
बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीत नरेगामधून कामाची देयके अदा करताना बोगस व बनावट पावत्या जोडून निधी उचलण्यात आला आहे.
नागपूर : बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीत नरेगामधून कामाची देयके अदा करताना बोगस व बनावट पावत्या जोडून निधी उचलण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य अमरसिंह पंडित यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, या प्रकरणात फसवणूक झाली. विक्रीकर व जीएसटी भरण्यात आलेला नाही. बेनामी बँक खाते उघडून अफरातफ र करण्यात आल्याचे निदर्शनास आणले. या प्रकरणातील दोषींच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. अमरसिंह पंडित म्हणाले, बनावट व खोट्या फर्मला निधी देण्यात आल्याचे निदर्शनास आणले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
२७१४ विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. यातील १०८४ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. नगद नारायण कंपनी,
माऊ ली ड्रील कंपनी यासह अन्य कंपन्यांची बिले सादर करण्यात आली. परंतु या कंपन्या नोंदणीकृत नाहीत.